दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; बापलेकासह तीन जण ठार

0

वाकोद ता. जामनेर : प्रतिनिधी
दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन त्यात बाप लेकासह तीन जण ठार झाले. ही भीषण अपघात देऊळगाव गुजरीनजीक धामणगाव बढे रस्त्यावर बुधवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास झाला.
प्रवीण नामदेव माळी (वय ४५) व अतुल प्रवीण माळी ( १७, रा. देऊळगाव गुजरी, ता जामनेर) हे बाप लेक आणि विलास भगवान गव्हाळ (२८, रा. खेडी पान्हेरा, ता. मोताळा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.
प्रवीण आणि अतुल हे दुचाकीने देऊळगाव गुजरीकडे येत होते. त्याचवेळी समोरुन दुचाकीने विलास व खालीद जमशेद तडवी (रा. देऊळगाव गुजरी) हे दोघे खेडी पान्हेरा गावाकडे जात होते. खालीद वगळता इतर तीन जण जागीच ठार झाले.
घटना घडला त्या ठिकाणी जंगल परिसर असल्याने मदत लवकर मिळू शकली नाही.
विलास हा खालीदकडे पाहुणा म्हणून आला होता. पहूरचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, फत्तेपूर दूर क्षेत्राचे अनिल सुरवाडे, दिनेश मारवळ, प्रवीण चौधरी व किरण शिंपी यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले. खालीद यास जळगाव येथे हलविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.