अयोध्यानगरमध्ये वाळूची चोरटी वाहतूक; डंपरवर कारवाई

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील अयोध्यानगर भागातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील अयोध्या नगर भागातून (एमएच 19 झेड 5248) या क्रमांकाच्या डंपरमधून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. या गुप्त माहितीनुसार त्यांनी कर्मचाऱ्यांना कारवाईच्या सुचना दिल्या.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, दिपक चौधरी, सचिन मुंढे, यांच्या पथकाने सोमवारी अयोध्यानगर परिसरात सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत चालकाला वाळु वाहतुकीचा परवाना विचारला असता, त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याने डंपरवरील चालक पवन शिवलाल सोनवणे (वय २१, रा.बांभोरी ता.धरणगाव) याला ताब्यात घेतले असून सदरचे डंपर हे मुकेश उत्तम साळुंखे रा. बांभोरी प्र.चा. ता. धरणगाव यांच्या मालकीचे असल्याची कबूली चालकाने दिली आहे.

त्यानुसार डंपरसह ६ हजार रुपये किंमतीची वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.