‘रेश्मा’ च्या नावावर सगळ्यात जास्त दूध देण्याचा विक्रम !

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

हरियाणा राज्यातील मूर जातीच्या रेशमा नामक म्हशीने सगळ्यात जास्त दूध देण्याचा विक्रम केला असून याची राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी रेश्माचं 33.8 लिटर दूधाची नोंद घेतली आहे..

म्हशीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार रेशमा जास्त दूध देत असल्यामुळे तिचा सत्कार करण्यात आला आहे. ज्यावेळी रेश्मा आई झाली त्यावेळी दूधात वाढ झाल्याचे मालकाने सांगितले. 33 लिटर दूध देत असल्यामुळे रेश्माचा राष्ट्रीय पातळीवर सत्कार करण्यात आला आहे.

रेश्मा जेव्हा पहिल्यांदा आई झाली होती, त्यावेळी तिने 19-20 लीटर दूध लिटर दूध दिलं होतं. दुसऱ्यादा ज्यावेळी रेश्मा नावाची म्हैस आई झाली. त्यावेळी 30 लीटर दूध द्यायला लागली. त्यानंतर जेव्हा-जेव्हा म्हैस आई झाली. त्यावेळी तिच्या दूधाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड यांनी रेश्माचं 33.8 लिटर दूधाची नोंद घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.