प्रतीक्षा संपली ! ३३ हजार शिक्षकांची भरती सुरु

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पाच सहा वर्षांची प्रतीक्षा संपली असून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरतीला प्रारंभ झाला आहे. जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्ये २३ हजार तर खासगी अनुदानित शाळांमध्ये आठ ते दहा हजार पदांची भरती होणार आहे. १ ते ८ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना ‘पवित्र’वर नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्हा परिषदांच्या जवळपास ७० हजार शाळा असून त्याअंतर्गत ६५ लाखांहून अधिक विद्यार्थी राज्यभरात शिक्षण घेत आहेत. महापालिका, नगरपालिकांच्या शाळांमध्येही विद्यार्थ्यांच्या तुलनेत शिक्षक खूपच कमी आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नयेत म्हणून ‘शिक्षण सारथी’ योजनेतून सेवानिवृत्त शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. पण, आता त्यांची नियुक्ती थांबविण्यात आली असून त्या शाळांना भरतीतून नवीन शिक्षक दिले जाणार आहेत. ऑक्टोबरअखेर ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सध्या ‘पवित्र’वर उमेदवारांना नोंदणी करावी लागणार असून त्यात त्यांना प्राधान्यक्रम, जातसंवर्ग, विषयानुसार माहिती अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संबंधित जिल्हा परिषदांच्या अंतिम बिंदुनामावलीनुसार कागदपत्रे व गुणांची पडताळणी होवून उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि अंतिम निवडी होतील, असे भरतीचे टप्पे आहेत.

 

तसेच खासगी अनुदानित शाळा, महाविद्यालयांमधील बिंदुनामावली व संचमान्यतेनुसार जेवढी रिक्त पदे असतील, त्यानुसार त्यांना ‘पवित्र’वर जाहिरात अपलोड करावी लागणार आहे. पण, काही शाळांना आताच्या भरतीत सहभागी होता नाही आले आणि काही दिवसांनी त्यांची पदे रिक्त झाल्यास पुन्हा तीन महिन्यांनी भरतीत सहभागी होता येणार आहे. नवीन बदलानुसार आता खासगी संस्थांमधील शिक्षकांची भरती ‘पवित्र’वरूनच होणार आहे. त्यासाठी तीन उमेदवारांना त्या शाळांवर मुलाखतीसाठी पाठविले जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.