तरसोद येथे वृद्ध महिलेच्या घरातून २५ हजारांचा ऐवज लांबविला

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील तरसोद येथे महिलेचे बंद घर फोडून चोरट्यांनी लॉकर सह दागिने असा ऐकून 26 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, तरसोद गावात बौद्धवाडा परिसरात ताई बाई अशोक सोनवणे वय ६५ या वृद्ध महिला राहत असून २२ मार्च रोजी रात्री दहा ते २३ मार्च रोजी सकाळी ९ वाजे दरम्यान ताईबाई यांचे घर बंद होते. घर बंद असल्याचे संधी साधत चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व घरातील वीस हजार रुपये रोख तसेच सहा हजार रुपयांच्या दोन ग्रॅम च्या सोन्याच्या बाह्या असा एकूण 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. घटना समोर आल्यानंतर ताई बाई सोनवणे यांनी याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हे. कॉ. अतुल महाजन हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.