दिलासा : सुरुंगामधून लवकरच ४१ कामगारांची होणार सुखरूप सुटका

0

उत्तरकाशी ;- सिलक्यारा सुरुंग दुर्घटनेत 41 मजूर फसले असून देशासह जगाचे लक्ष लागलेला तो क्षण लवकरच येऊन ठेपणार आहे. 41 मजूरांची सुरुंगमधून सुखरुप सुटका होईल. उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथे हि घटना घडली होती.

13 नोव्हेंबर रोजी हा प्रकार समोर आला होता. गेल्या 15 दिवसांपासून या मजूरांना बाहेर काढण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. आता हे मजूर काही तासातच बाहेर पडतील. त्यांना बाहेर पडल्यानंतर वैद्यकीय सेवा आणि अन्य सेवांचा जलद पुरविण्याची तजवीज करण्यात आली आहे. त्यासाठी चिनूक हे हेलिकॉप्टर पण तैनात ठेवण्यात आले आहे. गरज पडल्यास मजुरांना तात्काळ एअरलिफ्ट करुन हवाई मार्गाने रुग्णालयात नेण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.