आज कुकुडमुंडा ग्रामपंचायत वर श्रमजीवी संघटनेचा ठिय्या आंदोलन ,,,

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

सुरगाणा; आज दिनांक 8 फेब्रुवारी 2022 रोजी आज श्रमजीवी संघणेच्या वतीने कुकुडमुंडा ग्रामपंचायत वर आंदोलन करण्यात आले. गेल्या पाच वर्षापासून कोणतेही काम अपूर्ण केल्याने  या मध्ये कुकुडमुंडा ग्रामपंचायत पैकी उंबरपाडा , कुकुडमुडा. दांडीचीबारी.आंबाडदहाड , वडपाडा.या गावातील महिला पुरुष उपस्थित होते.

यामध्ये 14 वित्त 15 वित्त व पेसा निधीतुन गेल्या 5 वर्षापासून पेंडिंग असलेले काम बांधकाम त्वरित सुरू करणे आमचे मुलभूत अधिकार आम्हाला मिळालेच पाहिजे या मागणीसाठी श्रमजीवी  संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत वर आंदोलन केले.

यावेळी ग्रामपंचायत ग्रामसेविका – सीता थविल यांनी मागील 2017 पासून तर आतापर्यंत पेंडिंग काम आहेत अपूर्ण काम आहेत ते आम्ही पंधरा दिवसात पूर्ण करतो असे लेखी आश्वासन दिले.या मध्ये उपस्थित तालुका अध्यक्ष – राजू राऊत .ता सचिव – दिनेश मिसाळ .सीताराम सापटे , गोविंद वाघमारे , विष्णू वाघमारे , परशराम वाघमारे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.