ट्रॅप शूटर प्रीती राजक बनली इंडियन आर्मीतील पहिला महिला ‘सुभेदार’

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारताची ट्रॅप शूटर प्रीती राजकने भारतीय लष्करातील सुभेदार ही रँक मिळवणारी पहिली महिला ठरली आहे. प्रीती यापूर्वी भारतीय लष्करात हवालदार या रँक वर होती. तिला पदोन्नती देण्यात आली आहे. याची घोषणा आज झाली, हा क्षण भारतीय लष्करासाठी ऐतिहासिक ठरला आहे.

सुभेदार प्रीती ने भारतातील लष्करातील आपला प्रवास 2022 मध्ये कॉर्प ऑफ मिलिटरी पोलीस म्हणून सुरू केला होता. तिने आपल्या कामगिरीने सुभेदार पदापर्यंत मजल मारली आहे. भारतीय लष्कराने आपल्या वक्तव्यात म्हटले की, “हवालदार प्रीती राजकला पदोन्नती मिळाल्याचे जाहीर करताना भारतीय लष्कराला खूप अभिमान वाटत आहे. ती एक उत्तम शूटर आहे, ती आता लष्करात सुभेदार म्हणून कार्यरत आहे”.

कोण आहे प्रीती राजक
प्रीती राजक ने हांगझू येथे झालेल्या 19 व्या एशियन गेम्स मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं. महिला ट्रॅप शूटिंग सांघिक प्रकारात तिने दमदार कामगिरी केली होती. तिच्या या कामगिरीची दखल घेत, भारतीय लष्कराने तिला आऊट ऑफ टर्न पदोन्नती दिली. प्रिती सध्या भारतीय महिला ट्रॅप प्रकारात सहाव्या स्थानावर आहे. ती सध्या पॅरिस ऑलिम्पिक 2024 ची तयारी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.