लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने धुळे ते अयोध्या अशी बस सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा येत्या १० फेब्रुवारीपासून धुळ्यातून सुरु होईल, रॅम भक्तांना थेट अयोध्येपर्यंत जात येणार आहे. भाविकांनी बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन धुळे एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक विजय गीते यांनी केले आहे.
धुळेकरांना अयोध्येतील राम मंदिराचे दर्शन सहजपणे घेता यावे यासाठी एसटी महामंडळाने धुळ्याहून थेट अयोध्येपर्यंत बस सेवा सुरु करण्याचा निर्धार केला. सध्या एक बस सुरु करण्यात येणार आहे. त्यानंतर प्रतिसाद पाहून बसची संख्या वाढवली जाईल असे गीते यांनी नमूद केले. या सेवेसाठी ४ हजार ५४५ रुपये शुल्क आहेत. ही बस १० फेब्रुवारी पहाटे ४ वाजता धुळ्याहून निघेल. १२ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता अयोध्येत पोहाचेल. त्यानंतर बारा तारखेला अयोध्यातून वाराणसीला जाईल. वाराणसी येथे प्रयागराजला मुक्कामी असेल, त्यानंतर पुन्हा सकाळी धुळ्याकडे बस प्रस्थान करेल. या प्रवासादरम्यान दोन चालक बस सोबत असतील असेही गितीने स्पष्ट केले.