मोठी बातमी.. १० वी, १२ वीच्या परीक्षा ऑफलाइनच; सुप्रीम कोर्टाने फेटाळली याचिका

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

देशभरात दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होतील, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. सीबीएसई, आयसीएसईसहित राज्यांच्या शिक्षण बोर्डाच्या परीक्षा या ऑनलाईन व्हाव्यात, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. प्रत्यक्ष उपस्थित राहून परीक्षा देण्यात कोणतीही अडचण नाही. या युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरला आहे. त्यानंतर विरोधाची याचिका फेटाळून लावण्यात आली.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतरही, शाळांत ऑफलाईन शिक्षण सुरु करण्यात आले नव्हते. तसेच काही ठिकाणी अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नव्हता. तसेच वर्गही पूर्ण क्षमेतेने भरवण्यात आले नव्हते. अशा स्थितीत ऑफलाईन परीक्षा नकोत, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा दावा होता.

परीक्षा रद्द करुन पर्यायी मूल्यांकन प्रक्रिया राबवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण झाल्याशिवाय परीक्षा होतीलच कसा, असा प्रश्न न्यायाधीशांनी विचारला. मार्च आणि एप्रिलमध्ये या परीक्षा आता ऑफलाईन होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.