खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून संघटना तक्रार राखून स्पर्धा घेणार

0
जिल्हाधिकारी, आयुक्त व पालकमंत्र्यांची भेट घेऊन तक्रारीचे निवारण करणार
जळगाव :- ९ सप्टेंबर रोजी जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी यांची तातडीची सभा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यात विविध संघटनेचे एकूण १९ पदाधिकारी उपस्थित होते.
 सदर सभेत शालेय स्पर्धला तांत्रिक सहाय्य संघटनांनी करावे परंतु तक्रार राखून ते करण्यात यावे कारण आपल्यामुळे खेळाडूंचे नुकसान होता कामा नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
 तसेच क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल व क्रीडा धोरण बाबत सर्व तक्रारी एकत्रित करून ज्या जिल्हा पातळीवर सोड वण्यासारखे आहेत त्या जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सोडवू व ते सोडवण्यास अपयशी ठरल्यास मा पालकमंत्र्यांच्या माध्यमाने त्यांच्यातून मार्ग काढूअसे ठरले.
 तसेच क्रीडा धोरण बाबत राज्य सरकारकडे असलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी लवकरच आयुक्त क्रीडा व युवक सेवा संचालनालय, माननीय क्रीडा मंत्री महाराष्ट्र राज्य व वेळ प्रसंगी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याशी प्रत्यक्ष भेटून चर्चा  करून त्या अडचणी सोडवण्यात येतील असे सर्वानमुते ठरले.
 जिल्हा क्रीडा अधिकारी यांना बुधवारी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी प्राथमिक स्वरूपाची चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे सर्वानुमाते ठरले.
संघटनाना आवाहन
संघटनेचे जे काही क्रीडा अधिकारी कार्यालय, क्रीडा संकुल बाबत समस्या,तक्रारी असतील त्यांनी सोमवार संध्याकाळ पर्यंत लेखी स्वरूपात प्रदीप तळवलकर, नितीन बर्डे,राजेश जाधव, फारुक शेख यांच्या कडे सादर करावे.
 सभेत यांची होती उपस्थिती
 सभेचे अध्यक्षस्थानी माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, शाम कोगटा, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रदीप तळवलकर, क्रीडा संघटक फारुक शेख, राजेश जाधव,श्रीमती अनिता पाटील, श्री नितीन बर्डे, दिलीप गवळी, योगेश जाधव, रंजीत पाटील, दिलीप घुले, निलेश बाविस्कर, योगेश सोनवणे, नरेंद्र भोई, रवींद्र धर्माधिकारी, जितेंद्र शिंदे, विवेक अडवणी व अनिल माकडे आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.