बापरे.. कोब्राला पकडायला गेला सर्पमित्र; अन्…, धडकी भरवणारा व्हिडीओ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सर्वात विषारी आणि धोकादायक समजला जाणारा कोब्रा साप आपल्या देशाच्या दक्षिणी राज्यांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. त्यामुळे इथल्या लोकांना अनेकदा या सापाचा सामना करावा लागतो. सोशल मीडियावरही या घटनांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात समोर येत राहतात. हे व्हिडिओ पाहून कोणाचाही थरकाप उडेल.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये केरळचे प्रसिद्ध सर्पमित्र वावा सुरेश दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये ते आपल्या हाताने कोब्रा साप पकडताना दिसतात. ते या सापाला एका पिशवीमध्ये टाकण्याचा प्रय़त्न करताना दिसतात. मात्र, साप संधी मिळताच त्यांच्या पायाला चावतो. यानंतर ते सापाला सोडून आपल्या पायाला पकडू लागतात.

मिळालेल्या माहितीनुसार, याआधी वावा सुरेश यांनी अनेकदा कोब्रा सापाला अगदी सहज पकडलं आहे. याशिवाय कित्येक वेळा त्यांनी स्थानिक लोकांनाही सापापासून वाचवलं आहे. सध्या कोब्राच्या विषाचा त्यांच्यावर अतिशय घातक परिणाम झाला आहे. सापाने चावा घेतल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

इथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. सहसा स्वप्नातही कोब्रा किंवा इतर कोणता विषारी साप दिसला की आपल्याला घाम फुटतो. मात्र, सर्पमित्र आपला जीव धोक्यात टाकून सापांना तसंच माणसांना सापापासून वाचवताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा हैराण करणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत लोकांना असं करताना सावधान राहाण्याचा सल्ला दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.