धक्कादायक; २० वर्षीय मुलाने केला स्वतःच्या अपहरणाचा बनाव

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वडिलांपासून पैसे घेण्यासाठी २० वर्षीय मुलानेच स्वतःच्या अपहरणाचा बनाव धक्कादायक व चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील फादरवाडी भागातील हे प्रकरण आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, वसईतील फादरवाडी भागातील २० वर्षीय मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसात केली होती. त्यांचा मुलगा ७ डिसेंबराला घरातून निघून गेला जो पुन्हा परत आला नसल्याचे या तक्रारीत म्हणाले होते. तसेच मुलाने त्यांना फोन करून अपहरण झाल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाला मुलगा
मुलाने वडिलांना फोन करून “तीन जणांनी माझे अपहरण केले आहे. ते ३० हजार रुपयांची मागणी करत आहे. खंडाळे दिली नाही तर, मला मला मारून टाकतील..” असे म्हणत एक QR कोडही पाठवल्याचे त्यांनी या पोलीस तक्रारीत म्हणाले होते. या तक्रारीनंतर मुलाच्या तपासासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहे. वसई, विरार, नालासोपारा आणि इतर ठिकाणी मुलाचा शोध घेतला. अखेर पोलिसांनी शनिवारी (९, डिसेंबर) वसई फाटा येथून या मुलाचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. ज्यामध्ये धक्कादायक खुलासा झाला.

मुलाला त्याची गाडी दुरुस्त करण्यासाठी वडिलांकडून पैसे हवे होते. मात्र वडील पैसे द्यायला तयार नव्हते. त्यामुळेच हा सगळा अपहरणाचा बनाव रचल्याचे समोर आले. पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, मुलाने पाठवलेला QR कोड ओळखीचा वाटल्याने वडिलांना संशय आला. ज्यामुळे त्यांनी पैसे न पाठवता पोलिसांत तक्रार दाखल केली.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.