मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क
श्री निवासनी सप्तशृंगी देवीच्या मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी देवीच्या चरणी भाविक साड्या अपर्ण करत असतात. मंदिर संस्थानकडून मान्यवरांना आमंत्रित करून गावातील गरजू महिलांमध्ये साड्यांचे वितरण करण्यात आले.
शिरागड ग्रामपंचायत कार्यलयात निवासिनी श्री सप्तशृंगी देवी सेवा प्रतिष्ठान शिरागड व सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय जळगाव विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सहाय्यक धर्मादाय आयुक्त आर. एम. ठवरे व लोकनियुक्त सरपंच योगिताताई सोनवणे यांच्या हस्ते असंख्य गरीब व गरजू महिलांना वस्त्रदान करण्यात आले.
यावेळी धर्मदाय कार्यालय अधीक्षक, निरीक्षक अनिल चौधरी, लघुलेखक किशोर बच्छाव सह श्री देवी संस्था अध्यक्ष योगराज सोळंके, उपाध्यक्ष शांताराम सोळंके, सचिव प्रतापदादा सोनवणे, विलास सोळंके, हिम्मत सोळंके, सुधाकर सोळंके, रविद्र सोळंके, निलेश सोळंके, सुधाकर कोळी, आशा सोळंके, रामकृष्ण सोळंके, शिरागड /पथराडे येथील ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या. या उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले.