Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती
    महाराष्ट्र

    शिक्षक भरतीबाबत महत्वाची माहिती

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 18, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क 

    शिक्षक भरतीबाबत महत्वाची बातमी आहे. फेब्रुवारी व मार्च महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षण सेवक / शिक्षक भरतीसाठी ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२’ घेण्यात आली होती. यातील उमेदवारांना स्व-प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

    चाचणी दिलेल्या उमेदवारांना दि. १ ते १५ सप्टेंबरपर्यंत स्व-प्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी पवित्र पोर्टलवर सुविधा देण्यात आली होती. परंतु राज्यातील काही भागात इंटरनेट व्यवस्थित सुरू नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे दि. १४ पर्यंत पोर्टलवर स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणे अनेक उमेदवारांना मुदतीत शक्य झाले नाही. त्यामुळे यासाठी दि. २२ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च २०२३ या कालावधीमध्ये ही चाचणी घेण्यात आली होती. त्यासाठी २, ३९, ७३० उमेदवारांनी नोंदणी केली होती. तर २,१६,४४३ उमेदवारांनी चाचणी दिली.

    जे उमेदवार स्व-प्रमाणपत्र पूर्ण करणार नाहीत, ते नव्याने होणाऱ्या शिक्षण सेवक / शिक्षक भरतीसाठी पुढील प्रक्रियेसाठी पात्र ठरणार नाहीत. प्रमाणीकरण करीत असताना अथवा पोर्टल संदर्भात इतर कोणतीही शंका असल्यास किंवा अडचणी येत असल्यास edupavitra2022@gmail.com या ईमेलवर उमेदवारांनी आपला अर्ज पाठवावा. त्यावर लवकरात लवकर उत्तर देण्यात येईल. यासाठी कोणताही कर्मचारी, अधिकारी अथवा त्रयस्थ व्यक्तीशी संपर्क करू नये. उमेदवारांनी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर भेट देऊन कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

     

     

    #maharashtra Pavitra Portal Shikshak Bharti
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif