देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क
सरकारच्या विविध योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या बुलडाणा आणि चिखली येथील महाराष्ट्र राज्य परिवहन अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे चिखली आगारच्या बसेस पूर्ववत सुरू करण्याची मागणी ग्रामसभेने केली आहे.

खल्ल्याळ गव्हाण, सिनगाव जहागीर, पांगरी माळी, डोईफोडे वाडी, गारगुंडी, डोलखेड, वानेगाव या गावाची लोकसंख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकारच्या याअर्धे तिकीट योजनेपासून रोजनिशी पाच हजार महिला वंचित राहत आहे. तर ७५ वर्षावरील पुरुष यांना लाभ मिळत नाही. परिणामी खाजगी वाहन सुरू असल्याने सरकारने त्या व्यक्तींना दिलेला लाभ मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
अशी परिस्थिती लक्षात घेता सरकारची योजना मिळावी म्हणून संबंधित ग्रामपंचायतने ग्रामसभेच्या ठरावानुसार एसटी बस सुरू करावी असे संबंधित अधिकारी यांना कळविले आहे.


