पहुर पोलिस स्टेशनतर्फे शेंदुर्णीत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

पहुर पोलीस स्टेशनच्या वतीने शेंदुर्णीत पारस मंगल कार्यालयात रोजा इफ्तार पार्टीचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे होते.

प्रारंभी पहुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंदु मुस्लिम बांधवांनी आपापले सण उत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन करत पवित्र रमजान महिन्याचे महत्त्व विषद करत रमजान, अक्षय तृतीया व भगवान परशुराम जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व या कार्यक्रमाचा उद्देश विषद करत मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादीचे नेते संजय गरुड, सागरमल जैन, भाजपचे नेते गोविंद अग्रवाल, अमृत खलसे, उपनगराध्यक्ष निलेश थोरात, जावा शेठ, खलील डेप्युटी, सुधाकर बारी, शांताराम गुजर, डॉ. किरण सुर्यवंशी, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय सुर्यवंशी, भाजपचे शहराध्यक्ष डॉ. पंकज गुजर, नगरसेवक, मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेचे रविंद्र सुर्यवंशी, अमृत खलसे, संजय गरुड, गोविंद अग्रवाल व मान्यवरांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत हिंदु मुस्लिम एकतेचा संदेश देण्यासाठी पोलिसांनी घेतलेल्या उपक्रमांनी गावातील सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात पाचोरा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी भारत काकडे यांनी हिंदु मुस्लिम तसेच इतर धर्मियांचे सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आल्याचे सांगितले. रमजान ईद, भगवान परशुराम जयंतीनिमित्त सर्वांनी सलोख्याचे वातावरण कायम ठेऊन पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन शेंदुर्णी दुरक्षेत्रचे पोउनि. दिलीप पाटील यांनी तर आभार हे काँ.प्रशांत विरनार यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.