स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी; धनाजी नाना चौधरी संस्थेंतर्गत विविध कार्यक्रम…

0

 

जळगांव, लोकशाही न्युज नेटवर्क;  

शहरातील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीचे लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्याची पंच्याहत्तर वर्षानिमित्त “आजादी का अमृत महोत्सव”, महाराष्ट्र शासनातर्फे “स्वराज्य महोत्सव” आणि क.ब.चौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या युनिट तर्फे ९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधी अंतर्गत ९ ऑगस्ट रोजी सामूहिक राष्ट्रगीत, वृक्षारोपण १० ऑगस्ट रोजी निबंध स्पर्धा आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या मध्यस्थीने भारत सरकारचे माहिती व सूचना प्रसारण मंत्रालयातंर्गत जळगाव शहरातील क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या मदतीने “आजादी का अमृत महोत्सव” चित्ररथाचे जळगाव शहरातील १० किलोमीटर परिसरामध्ये हर घर तिरंगा, आजादी का अमृत महोत्सव या आशयाचा सुंदर मनमोहक चित्ररथ विविध उद्घोषणा देऊन जनजागृती केली. ११ ऑगस्ट रोजी हर घर घर तिरंगा झेंडा प्रबोधन पर रॅली, १२ ऑगस्ट रोजी महाविद्यालय परिसरात हर घर तिरंगा ध्वज वाटप कार्यक्रम, १३ ऑगस्ट रोजी आझादी का अमृत महोत्सव या विषयावर विद्यार्थ्यांनी पोस्टर प्रदर्शन स्पर्धा आणि पोस्टर प्रदर्शन भरविले. आतापर्यंत महाविद्यालयात वरील उपक्रम अतिशय जल्लोसात उत्साहात संपन्न झाले.

महाविद्यालयातील विद्यार्थी ज्या भौगोलिक परिक्षेत्रात वास्तव्यास आहेत तेथे १४ ऑगस्ट २०२२ रोजी परिसरातील नागरिकांना हर घर तिरंगा आचारसंहिते बद्दल माहिती देणार आहेत. १५ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात ७ वाजून ४५ मिनिटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम आहे. १६ ऑगस्ट २०२२ रोजी विद्यार्थी महाविद्यालय परिसर अथवा ते राहत असलेल्या परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवणार आहेत. आणि १७ ऑगस्ट २०२२ रोजी. महाविद्यालयात रांगोळी स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

अशा रितीने महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागातून अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात “आझादी का अमृत महोत्सव” व महाराष्ट्र शासनातर्फे “स्वराज्य महोत्सव” संपन्न होत आहे. सदर कार्यक्रम हा धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव व शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी विकास विभागांतर्गत संपन्न होत आहे.

वरील कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. निलेश शांताराम चौधरी, डॉ. मिलिंद काळे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. भारती गायकवाड, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते, डॉ. रविंद्र लढे विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. जुगल घुगे, महिला विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. कल्पना भारंबे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. राजकुमार लोखंडे यांच्या समन्वयातून कार्यक्रमाचे आयोजन संपन्न होत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे , प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून कार्याक्रमांचा आराखडा तयार झाला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालय परिसरातील नागरिक , महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.