SBI चे 3 ATM फोडून 55 लाखाची रोकड लंपास

0

धानोरा  |  प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली आणि खामगाव तालुक्यातील SBI BANK चे 3 ATM गॅस कटरच्या साह्याने कापून 55 लाख रुपयांची रोकड लंपास करण्याची घटना घडली आहे. दि. 30 जुलैच्या सकाळी सदर प्रकार लक्षात येताच बैंक कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू झाली. चिखली तालुक्यातील शेलुद आणि उंद्री तर खामगाव तालुक्यातील पळशी बु।। येथील SBI BANK च्या ATM ला चोरट्यांनी आपला निशाणा करत गॅस कटरच्या साह्याने मशीन कापून जवळपास 55 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची प्राथमिक माहिती सामोरे आली आहे. उंद्री येथील ATM मधून 9 लाख, शेलुद 27 लाख तर पळशी बु।। येथून 19 लाख रुपये असे एकूण 55 लाख रुपयांची रोकड लंपास करण्यात चोरट्यांना यश आल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. यामुळे मात्र BANK प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद करण्यात आला नसून पोलीस आणि BANK प्रशासन कार्यवाहीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून आले.

Leave A Reply

Your email address will not be published.