पंतप्रधान मोदींचे भाऊ म्हणतात, आम्ही ‘चहावाले’ नाहीत! ते तर …

0

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी  अनेकदा भाषणात सांगतात मी चहावाला आहे, पण, मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांनी म्हटले आहे की, आमचे वडील होते चहावाले, त्यांचे होते चहाचे दुकान. आम्हाला चहावाल्याचे बेटे म्हणा.

चहावाले तर आमचे वडील

प्रल्हाद मोदी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी उल्हासनगरला आले होते. त्या कार्यक्रमाच्या भाषणात ते म्हणालेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा ‘चायवाले का बेटा’ म्हणा. आम्ही सर्व भावंड चहा विकायचो. ज्यादिवशी ज्याचा नंबर लागेल, तो चहा विकायचा. पण चहावाले आम्ही नाही तर, आमचे वडील होते. त्यामुळे आम्ही सर्व ‘चायवाले के बेटे’ आहोत.

ज्याचा मुकुट मोठा 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यासाठी प्रल्हाद यांनी पत्रकारांना टोमणा मारला. म्हणालेत, चहा आम्ही सर्व भावंडांनी विकला, पण ज्याचा मुकुट मोठा, पत्रकार त्यालाच चालवतात. आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा ६ भावंडांना मोठे केले, पण पत्रकार नरेंद्र मोदींना ‘चहावाला’ म्हणतात! हे चूक आहे, त्यांना ‘चहावल्याचा मुलगा’ म्हणा.

Leave A Reply

Your email address will not be published.