‘क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले’ शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शिष्यवृत्ती वाटप

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्र शासन पुरस्कृत क्रांतीज्योती सावित्रीबाई ज्योतिबा फुले (Savitribai Jyotiba Phule) शिष्यवृत्ती योजना अंतर्गत आयोजित जळगाव शहर महानगरपालिका हद्दीमधील दहावी व बारावी परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती. ज्या विद्यार्थिनींना इयत्ता दहावीला ८५% पेक्षा अधिक गुण असतील अशा पिवळ्या रंगाचे रेशन कार्डधारक विद्यार्थिनींना रुपये ६००० शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. तर केशरी रंगाचे रेशन कार्डधारक विद्यार्थिनींना रुपये ५००० तसेच, इयत्ता बारावी ला ८०% पेक्षा अधिक गुण ज्या विद्यार्थ्यांना आहेत, अशा पिवळ्या रेशन कार्ड धारक विद्यार्थिनींना ७००० रुपये तर, केशरी रंगाचे रेशन कार्ड धारक विद्यार्थ्यांना ५००० रुपये शिष्यवृत्ती रोख स्वरूपात दिली जाणार आहे.

सदर विद्यार्थिनींना या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्याकरिता गुणपत्रक, रेशन कार्ड, रहिवासी पुरावा व बँक पासबुकची झेरॉक्स, महानगरपालिका प्रशासकीय इमारतीच्या बाराव्या मजल्यावर महिला व बालकल्याण विभाग येथे 31 जुलै पर्यंत जमा करावी. विहित नमुन्यातील अर्ज महिला व बालकल्याण विभागात उपलब्ध आहे.

(प्रथम अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींना प्राधान्य दिले जाईल.)

आवश्यक कागदपत्र

1) जळगाव महानगरपालिका हद्दीमध्ये दहा वर्षांपासून रहिवासी असावे

2) पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका धारक असावे

3) आधार कार्ड झेरॉक्स

4) बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची झेरॉक्स

5) इयत्ता दहावी आणि बारावी गुणपत्रक झेरॉक्स

अधिक माहितीसाठी संपर्क
श्री पांडुरंग पाटील अधीक्षक महिला व बालविकास
संपर्क-9158248457

Leave A Reply

Your email address will not be published.