ग्रामपंचायत सदस्य किरण ढिवरे यांचे कार्य कौतुकास्पद

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या तीन दिवसांपासून मरून पडलेला कुत्रा त्यांनी स्वतःनेला उचलून त्याची योग्य त्या पद्धतीने विल्हेवाट लावली. याबाबत अधिक माहिती अशी की मोरगांव बु.येथे नवीन ग्रा.पं.इमारतीचे काम चालू आहे. याठिकाणी बांधकाम झालेल्या ओट्याखाली सोमवारी रात्री पासून एक मादी कुत्रा मरुन पडले ला होते. तीन दिवस उलटूनही ग्रा.पं.कर्मचारी किंवा ग्रा.पं.इतर सदस्य यांना कुठलीही पुसटशी कल्पना नाही, असे त्यांच्या बोलण्यावरू दिसत होते. त्याच वेळी ग्रा.पं. सदस्य किरण ढिवरे यांना माहिती होताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सदरच्या कुत्रा स्वतः दोरीने बांधून उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेऊन.स्वतः नेऊन टाकला. या त्यांच्या सेवाभावी कृत्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. परंतु गेल्या तीन दिवसापासून ग्रामपंचायत जवळ पडलेल्या कुत्र्याकडे कोणाचीही लक्ष न जाणे ही सर्वात मोठी खेदाची बाब आहे. व यावरून ग्रामपंचायतीच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. गेल्या तीन दिवसापासून मरून पडलेल्या कुत्र्याची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. ग्रामपंचायत प्रशासनाने अशा गोष्टींकडे लक्ष द्यावे अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये होती. ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्था आहे व नागरिकांना पाणी आरोग्य व इ सार्वजनिक इतर सेवा. साफसफाई व गावातील आरोग्याच्या दृष्टीने कार्य करणे हे ग्रामपंचायतीचे आद्य कर्तव्य आहे. परंतु या गोष्टीवरून असे दिसून येते की याकडे स्थानिक प्रशासनाचे लक्ष नाही. कृपया स्थानिक प्रशासनाने लक्ष घालून वेळेवर कार्य करावे. अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.