धक्कादायक; विषारी औषध प्राशन करत सरपंचाची आत्महत्या…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क;

तालुक्यातील चुंचाळे येथील ४२ वर्षीय इसमाने शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्ये मागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सविस्तर वृत्त असे की, पाचोरा तालुक्यातील चुंचाळे येथील वाल्मिक वामन पाटील (वय – ४२) यांनी दि. २२ आॅगस्ट २०२२ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मजुरांना मजुरी वाटप करायचे सांगुन घरुन निघाले. दरम्यान नातेवाईकाच्या शेतात जावुन वाल्मिक पाटील यांनी विषारी औषध प्राशन करत जीवन यात्रा संपवली. वाल्मिक पाटील हे चुंचाळे गावचे सरपंच असुन आर्थिक व्यवहारात अडकल्याने त्यांनी आत्महत्या केली असावी अशी चर्चा परिसरात सुरू आहे.

मयत वाल्मिक पाटील यांचे पाश्चात्य वडिल, पत्नी, दोन मुले, एक भाऊ, एक बहिण असा परिवार असुन अतिशय मनमिळाऊ व हसमुख स्वभावाचे वाल्मिक पाटील यांचे अकस्मात निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.