APL, BPL रेशन कार्डांबाबत सरकारने दिली ‘ही’ महत्वाची सूचना

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यभरातील शिधापत्रिकांसाठी आलेल्या अर्जाचे ३१ मार्चपर्यंत पडताळणी केली जाईल आणि एक एप्रिलपासून शिधापत्रिका वितरित केला जातील, असे अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री के.एच.मुनियप्पा म्हणाले.

आमदार नयना मोटम्मा आणि विरोधी पक्षनेते आर.अशोक यांनी विचारलेल्या प्रश्नाला मंत्र्यांनी उत्तर दिले. आमदार मोटम्मा म्हणाल्या, ‘बीपीएल कार्ड अर्ज सादर करताना तांत्रिक अडचणी आहे. अनेकांना आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक केलेला नाही. त्यामुळे पाच किलो तांदळाचे पैसे अनेक लाभार्थ्यांपर्यंत अनेक महिन्यांपासून पोहोचलेलेनाहीत.

विरोधी पक्षनेते आर. अशोक म्हणाले, ‘राज्य सरकारने बीपीएल शिधापत्रिका देणे बंद केले आहे. तुम्ही म्हणता की, सर्व्हर डाऊन आहे आणि ही समस्या आहे. पाच हमी योजनांसाठी नागरिकांची संख्या वाढण्यासाठी तुम्ही बीपीएल कार्ड देत आहात का?

यावर अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचे मंत्री मुनियप्पा यांनी उत्तरे दिले की, मागील सरकारने विधानसभा निवडणुकीपासून २.९५ लाख कार्ड वितरित न करता ठेवले होते. मात्र आम्ही आतापर्यंत ५७ हजार नवीन कार्ड वितरित केले आहे. ज्यांनी आरोग्य उपचारासाठी अर्ज केले आहेत, त्यांना तत्काळ कार्ड देण्यात यावे, अशी सूचना केली आहे. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमुळे आम्ही ७४४ लोकांना बीपीएल कार्ड दिले आहेत. येत्या ३१ मार्चपर्यंत सादर केलेल्या अर्जांचा आढावा घेऊन कार्ड दिले जातील.’

Leave A Reply

Your email address will not be published.