स्वामी विवेकानंद महाविद्यालयच्या १८ विद्यार्थ्यांची संस्कृत शिष्यवृत्तीसाठी निवड

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय, नवी दिल्लीतर्फे अकरावी व बारावी ला संस्कृत विषय घेऊन विशेष गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही संस्कृत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. महाविद्यालय मधील दरवर्षी या शिष्यवृत्तीसाठी अनेक विद्यार्थी पात्र ठरतात. हीच परंपरा कायम ठेवत या वर्षी ही( 2021-22) स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय इयत्ता 11 व 12 वी संस्कृत विषय घेऊन शिक्षण घेणारे 18 विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली यांच्याकडून महाविद्यालयाला त्याबाबत पत्रान्वये कळवण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती.
शिष्यवृत्तीसाठी :- चौधरी माहेश्वरी नरेद्र, बडगुजर कृत्तिका ज्ञानेश्वर, पाटील श्रद्धा, शेलर श्रद्धा, सपकाळे दिव्या, झंवर अंजली, कु. किमया, शिरसाळे हितेश, बंगाली वैदेही, सोनवणे रूत्विका, साळुंके दिव्या, विशाखा पाटील, भालेराव श्रावणी, दर्शना वर्मा, जागृति महाजन व वैदेही तडे हे विद्यार्थी पात्र ठरले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना भारंबे , उपप्राचार्य प्रा. के जी. सपकाळे , पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे समन्वयक प्रा. स्वाती बर्हाटे, प्रा. उमेश पाटील, प्रा प्रसाद देसाई व सर्व शिक्षण व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.