ब्रेकिंग ! राष्ट्रवादीला धक्का, संजय गरूड समर्थकांसह भाजपात.. (व्हिडीओ)

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय गरूड यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ मंगेश चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1rmxPMEAoBLKN?t=i3dYmqhvZCW_oVMNSI_ueA&s=08

लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  मंत्री गिरीश महाजन यांचे जामनेर विधानसभा मतदार संघातील कट्टर राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)  नेते संजय गरूड यांनी भाजपात प्रवेश केला आहे.

काही दिवसांपूर्वीच जामनेर तालुक्यातील मंत्री गिरीश महाजन यांचे राजकीय कट्टर विरोधक असलेले संजय गरुड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. दरम्यान आयोध्यातील श्री राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आयोजित एका शोभायात्रेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) संजय गरुड व मंत्री गिरीश महाजन यांच्यात भेट झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

संजय गरूड यांनी आपल्या समर्थकांसह मुंबईतील यशवंतराव चव्हाण स्मृती केंद्रातील भव्य कार्यक्रमात भाजपात प्रवेश केला आहे. यामुळे आता जळगाव जिल्ह्यात राजकीय समीकरण नक्कीच बदलणार आहे..

 

Leave A Reply

Your email address will not be published.