सांगवी येथील तरुणी तीन दिवसांपासून बेपत्ता

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

सांगवी येथील २३ वर्षीय तरूणी ही गेल्या तीन दिवसांपासून कॉलेजला जात असल्याचे सांगून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी यावल पोलीस स्टेशनंला बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे.

सविस्तर माहिती अशी कि, सांगवी तालुका यावल येथील राहणारी २३ वर्षीय तरूणी ही सोमवारी ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कॉलेजला मार्कशिट घ्यायला जात असल्याचे सांगून ती घरातुन निघाली. ती उशीरापर्यंत तरूणी ही घरी आली नसल्याने कुटुंबीयांनी तिच्या कॉलेजच्या मैत्रीणी व नातेवाईकांकडे व कॉलेजात सर्वत्र शोध घेतला परंतू तिची कोणतीही माहिती मिळून आली नाही. अखेर तरूणीच्या पालकांनी यावल पोलीस स्टेशनंला धाव घेवून खबर दिली. त्यानुसार यावल पोलीस स्टेशनंला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.