सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांमध्ये सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय! – चेतन राजहंस

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

तामीळनाडूतील द्रवीड मुन्नेत्र कळघम या पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलीन यांनी सनातन धर्माविषयी द्वेषमुलक विधान केले. सदर वक्तव्य हे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणारे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ‘हेट स्पीच’ होते. तरीही पत्रकार निखिल वागळे यांनी ‘उदयनिधी स्टॅलिनच्या मताशी मी सहमत आहे. अशी पोस्ट फेसबुकद्वारे केली. हा एकप्रकारे सनातन धर्माचा अपमान आहे आणि सनातन संस्थेची अब्रुनुकसानी होय. धर्म नष्ट होऊ शकत नाही, हे सनातन सत्य आहे. धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या मनामध्ये धार्मिक समुहाचा वंशविच्छेद हेच ध्येय आहे. यासाठी महाराष्ट्रातील सनातनधर्मी हिंदू समाजाने सजग होण्याची आणि लोकशाही मार्गाने या सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील पद्मालय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे जळगाव जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी संबोधित केले.

सनातन धर्म हा पुजा परंपरेशी नाही, तर कर्म-कर्तव्यांशी संबंधित आहे. गृहस्थ व्यक्तीसाठी वृद्ध मातापित्याची सेवा आणि अपत्यांचा साभाळ हा गृहस्थ धर्म आहे. दुकानदारांसाठी ग्राहकहित, डॉक्टरसाठी रुग्णांचे स्वास्थ्य रक्षण हा धर्म आहे. हा धर्म शाश्वत आहे; कारण तो अमेरिकेत आणि जळगाव येथे एकच आहे आणि १०० वर्षांपूर्वी अन् १०० वर्षांनंतरही हेच कर्तव्य कर्म कायम राहणार आहे. थोडक्यात सनातन धर्म स्थळ काळ बंधन नसलेला चिरंतन असा आहे. त्याला नष्ट करणे, म्हणजे कर्तव्य हिन समाज उत्पन्न करून सामाजिक अराजक उत्पन्न करण्याप्रमाणे आहे. असे सद्गुरू नंदकुमार जाधव यांनी म्हटले आहे.

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या विरोधात सध्या समविचारी संघटनांच्या वतीने जागृतीपर सनातन धर्मरक्षण अभियान राबवण्यात येत आहे. या अंतर्गत जागृतीसोबत धर्मविरोधी शक्तींचा लोकशाही मार्गाने विरोधही केला जाणार आहे. जळगाव जिल्ह्यात जळगाव सह भुसावळ, चोपडा, यावल, रावेर या ५ तालुक्यांत सनातन धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍यांच्या विरोधार तक्रारी दाखल करण्यात येणार असल्याचे हिंदु जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकारांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.