संभाजीनगरमध्ये भीषण अग्नितांडव, 7 जणांचा मृत्यू

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. छावणी परिसरात भीषण आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

चार वाजण्याच्या सुमारास अस्लम टेलरच्या दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील फर्निचर, काउंटर, सोफे आणि इतर साहित्य जळाले. मार्केट वस्तीतले हे दुकान आहे. दोन कुटुंब वरच्या मजल्यावर होते. खाली लागलेल्या आगीचा लोळ आणि धूर वरती गेल्याने सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

प्राथमिक अंदाजानुसार, धुरामुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र वैद्यकीय अहवाल मिळाल्यानंतर याबाबत समजू शकेल. मात्र  आग नेमकी कशामुळे लागले हे अद्याप समजू शकलेलं नाही. आग इतकी भीषण होती की आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. पण आगीमुळे पसरलेले धुराचे लोट वरच्या मजल्यावर राहणाऱ्या घरात गेले. यामुळे गुदमरून ७ जण मृत्यूमुखी पडले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.