निसर्ग चित्रातील रेखीवपणा लक्ष वेधून घेतो – डॉ केतकीताई पाटील

0

कला शिक्षक दत्तू शेळके यांच्या चित्रांचे प्रदर्शन

जळगाव – गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलचे कलाशिक्षक दत्तू शेळके यांच्या Panorama या चित्रकला प्रदर्शनाचे उद्धाटन गोदावरी फौंडेशन सचिव डॉ वर्षा पाटील व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांच्याहस्ते फित कापून थाटात उदघाटन झाले.

या चित्रकला प्रदर्शनात कला शिक्षक दत्तू शेळके यांनी काढलेले निसर्ग चित्र हे खूप मनभावक असे आहे. निसर्गचित्रातील रेखीवपणा आणि प्रत्येक स्ट्रोक हा श्री दत्तू शेळके यांच्या कलेचा उत्तुंग आणि मनस्वी परिचय आहे, असा आभास प्रत्येक चित्र पाहतांना होत असल्याचे डॉ केतकी ताई पाटील म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर गोदावरी फौंडेशन सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ केतकी ताई पाटील, चोपडा येथील माजी प्राचार्य मा.राजेंद्र महाजन, पु ना गाडगीळ अँड सन्सचे व्यवस्थापक संदीप पोतदार यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध चित्रकार श्याम कुमावत सर, चित्रकार पवार सर यांच्या सह अनेक कलाप्रेमी जळगाव कर यावेळी उपस्थित होते. येत्या 15 एप्रिल पर्यंत पु ना गाडगीळ सन्स येथील कला दालनात हे प्रदर्शन सुरू राहणार असून कला प्रेमींनी आवर्जून प्रदर्शनास भेट द्यावी असे आवाहन गोदावरी फौंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.