मोठी बातमी : बडे बिल्डर रडारवर, 11 ठिकाणी IT च्या धाडी

0

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी आलीय. आयकर विभागाकडून शहरात 11 ठिकाणी छापे टाकले जात आहेत. शहरातील विविध ठिकाणी या धाडी टाकल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे.

एकाच वेळी टाकण्यात येत असेल्या या धाडींमध्ये आयकर विभागाचे 200 कर्मचारी कार्यरत आहेत. शहरातील बड्या बांधकाम व्यावसायिकांवर धाड टाकली जात असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आयकर विभागाने एकाच वेळी अकरा ठिकाणी धाड टाकली. सकाळी सहा वाजल्यापासून आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. यामध्ये बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचं समजते. बांधकाम व्यावसायिकांच्या घर आणि कार्यालयांमध्ये आयकर विभाग ठाण मांडून बसले असल्याची माहिती मिळाली आहे.

आयकर विभागाची ही कारवाई पुढचे दोन ते तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कारवाई नेमकी कोणावर करण्यात आलीय याची अद्याप माहिती समजू शकलेली नाही.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.