ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय महिलांची यशोगाथा, साक्षी मलिक

0

लोकशाही, विशेष लेख

 

साक्षी मलिक (Sakshi Malik) यांचा जन्म ३ सप्टेंबर १९९२ रोजी झाला. त्यांचे वडील सुखबीर मलिक (Sukhbir Malik) दिल्ली परिवहन सेवेत तर आई सुदेश मलिक या शासकीय सेवेत आहेत. त्यांनी आपल्या कुस्तीची सुरुवात वयाच्या १२ व्या वर्षापासून केली. २००४ साली त्यांनी ईश्वर दहिया यांच्या आखाड्यामध्ये सरावाला सुरुवात केली. मुलींना कुस्तीचे प्रशिक्षण देणे हे दहीयांसाठी सोपे काम नव्हते. त्यात सोबत सरावासाठी एकही मुलगी नव्हती त्यामुळे मुलांसोबत स्पर्धा करावी लागत असे. मात्र हळूहळू दहिया यांनी लोकांचा विश्वास संपदान केला आणि त्यांचा आखाडा मुलींच्या प्रशिक्षणासाठी सर्वोत्तम आखाड्यांपैकी एक झाला.

साक्षी यांनी २०१४ मध्ये ग्लास्गो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधील ५८ किलो वजनी गटामध्ये त्यांनी रौप्य पदकाची कमाई केली. त्यानंतर २०१५ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत (Asian competition) त्यांनी ६० किलो वजनी गटामध्ये कांस्यपदक पटकावले. २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये (Rio Olympics) ५८ किलो फ्री-स्टाईल गटात पदक जिंकून साक्षी यांनी इतिहास रचला आहे. कुस्तीमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या आहेत.

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकांसह, साक्षी यांना २०१६ मध्ये राजीव गांधी खेलरत्न (Rajiv Gandhi Khel Ratna) आणि २०१७ मध्ये पद्मश्रीने (Padmashri) सन्मानित करण्यात आले.

डॉ. निलेश जोशी
७५८८९३१९१२

Leave A Reply

Your email address will not be published.