साहेब…साकळीतील ‘ पन्नी ‘ ची दारू बंद करा हो !

0

साकळी येथील शांतता समितीच्या बैठकीत माजी सभापतींची मागणी
मनवेल ता.यावल लोकशाही न्युज नेटवर्क

साहेब…! साकळी गावाच्या परिसरात खुलेआम ‘ पन्नी ‘ ची दारू सर्रासपणे विकली जात आहे.या पन्नीच्या दारूच्या आहारी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग गेलेला असून या दारूने गावातील तरुण वर्गाचे आरोग्य खराब होत आहे. या पन्नीच्या दारूमुळे गावातील अलीकडच्या काळात काही तरुणांनी आपला जीवही गमवला आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साहेब… आमच्या साकळी गावातील पन्नी ची दारू अगोदर बंद करा हो ! अशी
समाजहिताची मागणी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटू) सूर्यभान पाटील यांनी थेट साकळीच्या शांतता समितीच्या केली.व ही दारू लवकरात लवकर बंद करा अशी विनंती केली.श्री.पाटील यांनी समाज हिताची योग्य अशी मागणी केल्याने गावात एकच चर्चेचा विषय होता.

साकळी येथे गाव परंपरेची शिवजयंती,अक्षय तृतीया व रमजान ईद,महात्मा ज्योतिबा फुले जयंती असे सण उत्सव येत्या काळात साजरा केले जाणार आहे.हे सर्व सण-उत्सव शांततेत व सलोख्याने साजरे होण्यासाठी दि.८ रोजी साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात यावल पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.तथापि ही बैठक ऐन वेळेला आयोजित करण्यात आल्याने बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायत समोरून जाणाऱ्या नागरिकांना पोलीस अक्षरशः बोलवीत होते.व बैठकीला थांबा साहेब आलेले आहे असे पोलीस सांगत होते.या बैठकीला यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश माणगावकर,जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटू) पाटील,ग्रामविकास अधिकारी हेमंत जोशी यांचेसह साकळी व शिरसाड येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बैठकीच्या अगदी शेवटी -शेवटी सर्व विषय आटोपल्यानंतर माजी सभापती रविंद्र पाटील यांनी साहेब…! गावाच्या परिसरात पन्नीची दारू सर्रासपणे विक्री केली जात आहे. असे सांगताच माणगावकर साहेब अगदी थक्क झाले व त्यांनी सभेतच क्षणाचा विलंब न करता साकळीबीटचे पोलीस सिकंदर तडवी यांना या दारू विक्रीच्या प्रकाराबाबत विचारत दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी कागदपत्रे तयार करा असा आदेशच माणगावकर साहेब यांनी पोलिसांना दिला.हा सर्व प्रकार उपस्थित ग्रामस्थांसमोर उघड झाल्याने तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचा किती अंकुश आहे ? हे मात्र प्रकर्षाने दिसून आले.आता एका बड्या पदाधिकाऱ्याने पन्नीची दारू बंद करण्यासाठी केलेली मागणी पोलीस प्रशासन किती गांभीर्याने घेते ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एकूणच या बैठकीची गावात चर्चा रंगली होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.