आजचा दिवस असणार धोनी साठी मोठा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

राजस्थान (Rajasthan) विरुद्धचा सामना चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) यासाठी मोठा असणार आहे. आजचा दिवसही धोनीसाठी महत्वाचा असणार आहे. कारण धोनी चेन्नईचा कर्णधार म्हणून आज २०० वा सामना खेळणार आहे. हा एक मोठा रेकॉर्ड असणार आहे. धोनी पहिला खेळाडू असणार आहे, की जो आयपीएलच्या (IPL) इतिहासात एकाच संघाचा कर्णधार म्हणून २००वा सामना खेळणार आहे. धोनीनंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा नंबर लागतो. त्याने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार म्हणून एकूण १४६ सामने खेळले आहे.चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने येणार असून दोन्ही संघांचे लय राखण्याचे लक्ष्य असेल. चेन्नई आणि राजस्थान संघ हे यंदाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार म्हणून ओळखले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.