साकळी येथे संत रोहिदास महाराज जयंती साजरी

0

मनवेल ता.यावल । लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथे 5 फेब्रुवारी रविवार रोजी शारदा विद्यालयात संत रोहिदास महाराज जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री आर जे महाजन हे होते तसेच व्यासपीठावर पर्यवेक्षक श्री एस जे पवार, वाय बी सपकाळे, किरण कुमार चौधरी, एन .पी .पाटील आदी उपस्थित होते.

 

यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण केले. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष आर जे महाजन यांनी संत रोहिदास महाराज यांच्या जीवनाविषयी कर्म हीच ईश्वर पूजा, देशहितपर अभंग आणि त्यांच्या संतकाव्याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन .पी .पाटील यांनी केले तर आभार वाय बी सपकाळे यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.