साकळी जवळील पाण्याची टाकी तब्बल दोन वर्षापासून बंद, ग्रामपंचायतीचा अंदाधुंद कारभार

0

लोकशाही न्युज नेटवर्क

साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या मनमानी व गलथान कारभाराचे नमुने दर दिवसागणित गावासमोर येत आहे. त्यात अजून एका गलथान करभाराचा नमुना समोर आलेला आहे. पंचायत कार्यालयाजवळी पाण्याची बसकी टाकी गेल्या दोन वर्षांपासून पाण्याने भरली गेलेली नसल्याचे व त्यामुळे नागरिकांना पाणीपुरवठा झाला नसल्याचे धक्कादायक वास्तव सर्वांसमोर आलेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची भावना निर्माण झालेली आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याची गरज असतांना टाकी बंद ठेवून ग्रामपंचायतीला काय साध्य करायचे आहे ? असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

साकळी ता.यावल येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळ सार्वजनिक पाणीपुरवठा करणारी गावविहीर असून त्यालगत गावहाळ आहे. त्याचप्रमाणे या हाळालगतच ग्रामस्थांना पाणी भरण्यासाठी बसकी टाकी बांधण्यात आलेली आहे. गावाचे ग्रामभूषण तसेच तात्कालीन सरपंच स्व.मधुकरआप्पा महाजन त्यांच्या लोकहिताच्या दूरदृष्टीकोनातून सार्वजनिक पाणीपुरवठा करण्यासाठी सदरची व्यवस्था करण्यात आलेली होती. गेल्या अनेक वर्षापासून ही पाण्याची व्यवस्था सुरळीतपणे सुरू होती. सदर पाण्याची टाकी भरण्यात यावी व ती टाकी पूर्ववत सुरू करण्यात यावी यासाठी अनेक पदाधिकारी व नागरिकांनी वारंवार पाठपुरावा केला मात्र ग्रामपंचायतीच्या निगरगट्ट व मनमानी कारभारामुळे या टाकीत तब्बल दोन वर्षांपासून पाणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत परिसरालगतच्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत असते. सध्याच्या कडक उन्हाळ्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. तेव्हा नागरिक आणि भरण्यासाठी या टाकीवर येतात मात्र टाकीत पाणी नसल्याने त्यांना ते निराश होऊन माघारी फिरावे लागते. एकूणच ग्रामपंचायतीला कारभार किती लोकाभिमुख आहे? किती नागरिकांच्या हिताचा आहे? याचा प्रत्यय आलेला आहे. या पाण्याच्या टाकीच्या प्रश्नामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संतापाची भावना निर्माण झालेली आहे.

सदर पाण्याची टाकी का बंद आहे ? याबाबत ग्रामपंचायतला विचारले असता, पाणी सुरू करण्यासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या विज पंपाच्या मोटारीची केबल (वायर) मिळाली नसल्याने पाणी सुरू करण्यात आलेले नाही असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. तरी संबंधित प्रशासनाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून याबाबत दखल घेण्यात यावी व ग्रामपंचायतीला सदर टाकीत पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत लवकरात लवकर सूचना करण्यात याव्या अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.