Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»कृषी»सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या
    कृषी

    सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलल्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 30, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;- राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. राज्यात ३० जूननंतर होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आता ३० सप्टेंबरनंतर होणार आहेत. सहकार मंत्री अतुल सावे यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

    अनेक सहकारी संस्थांमधील सभासद शेतकरी खरीप हंगामातील शेतीच्या कामामध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात, असे कारण यासाठी दिले आहे. यामुळे सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.
    दरम्यान, राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले असून, ३० जूननंतर राज्यभरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच सहकारी संस्थांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकल्यात आल्या आहेत.

    यामध्ये निवडणुकीस पात्र असणाऱ्या सहकारी संस्थांची संख्या ८२ हजार ६३१ आहे. त्यातील ४९ हजार ३३३ सहकारी संस्थांच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. ४८ हजार ६६७ संस्थांच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. अशा संस्थांपैकी ४२ हजार १५७ संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सहा हजार ५१० सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामुळे इच्छुकांना काही काळ थांबावे लागणार आहे.

    #election sahkar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif