जाणून घ्या हेल्दी – टेस्टी रशियन सॅलड बनविण्याची रेसिपी

0

लोकशाही विशेष लेख

फार झालं ना आंबा(Mango), फणस (Fanas), काजू (Cashew), वगैरे… हे इतकं रोज रोज खाऊन वजन वाढत चाललं आहे त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल. सुट्टीचा आनंद द्विगुणित झाला खरा पण वाढत्या वजनाला आटोक्यात देखील आणलं पाहिजे ना. डायट तर नाही बुवा जमत आम्हाला पण खाण्यामध्ये थोडा व्टिस्ट दिला आणि काही तरी हलकं फुलकं आणि हेल्दी फूड म्हणून खाल्ले तर वाढत्या वजणाचा काटा स्थिर राहिल ना. कळलच असेल तुम्हाला आज आपण काही तरी हेल्दी आणि डायट फूड अगदी हलकंफुलकं बनवणार आहोत ते.. चला तर मग रशियन सॅलड रेसिपी पाहूयात कशी बनवायची….

रशियन सॅलड (Russian salad) शक्यतो पार्टीमध्ये उपलब्ध असतात. हेल्दी आणि टेस्टी आणि ‘क्विक इंस्टंट इझी फूड’ फूड मध्ये यांचा समावेश होतो. शरीरातील उर्जा निर्माण करून तुम्हाला हेल्दी ठेवण्याचं काम हे सॅलड करतं म्हणून तुम्ही ते कोणत्याही वेळी खाऊ शकता.

साहित्य:
१ कप मेयाॅनीज, १/२ कप दही, ४/५ चमचे अमूल क्रीम, ४/५ चमचे कन्डेन्स्ड मिल्क, २ चमचे साखर, १/२ चमचा ब्लॅक पेपर पावडर, मीठ चवीनुसार

फळं आणि फळभाज्या:
१ बटाटा, १ सफरचंद, २ गाजर, १/२ वाटी मटार, १ वाटी ब्रोकोली, १ वाटी अननस, १ वाटी द्राक्ष, १/२ वाटी डाळींबाचे दाणे ( सीझनल फ्रुट घेतले तरी हरकत नाही, बाजारात उपलब्ध असतील ते वापरा.) सर्व चौकोनी आकाराचे तुकडे करून घ्यावे.

कृती:
१) प्रथम बटाटे, गाजर, आणि मटार उकळत्या पाण्यातून ५ मिनिटं वाफवून घ्यावे, व निथळून थंड करून घ्यावे.
२) आता एका बाऊल मध्ये मेयाॅनीज, दही, क्रीम, कन्डेन्स्ड मिल्क, ब्लॅक पेपर पावडर, मीठ, साखर हे सर्व एकत्र फेटून घ्या.
३) आता सर्व फळं आणि फळभाज्या बनवलेल्या ड्रेसिंग मध्ये घालून हलक्या हाताने एकजीव करून घ्यावे.
४) वरतून डाळींबाचे दाणे टाकून छान प्लेटमध्ये सर्व्ह करा.

झालं आपलं झटपट आणि हेल्दी – टेस्टी रशियन सॅलड तयार. झटपट बनवा आणि प्रतिक्रिया कळवा.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे.
पत्रकार/फूड ब्लॉगर
९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.