अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क
येथील नगरपरिषद हद्दीतील मुख्य नालेसफाई मोहीम प्रशासक प्रशांत सरोदे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य निरीक्षक युवराज चव्हाण, संतोष बिऱ्हाडे,हैबतराव पाटील यांनी शहरातील प्रमुख नाले पावसाळ्यापूर्वीच जे.सी.बी मशिन च्या साह्याने सफाई करीता तीन पथका सह तिन जे.सी.बी ची नेमणूक केली आली असून त्यास ०९ मे २०२३ मंगळवार पासून पिंपळे रोड वरील नालेसफाई,ॲड ललीता पाटील यांच्या घरासमोरील फरशीपूल,धुळे रोड वरील नालेसफाई ,आर के फँक्टरी मागून नालेसफाई,बालेमियाँ दर्ग्यापासून बसस्थानकापर्यंत नालेसफाईची सुरुवात करण्यात आली.अमळनेर नगरपरिषदे कडून शहरातील सर्व नालेसफाई करण्यात येणार असून सदर मोहिमेत मुकादम ज्ञानेश्वर संदानशिव,सागर पवार,अनिल बाविस्कर सह शामराव करंदीकर, गणेश ब्रह्मे,महेंद्र बिऱ्हाडे आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.