मोठी बातमी.. रशियाकडून युद्धबंदीची घोषणा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर जगभरात मोठ्या घडामोडींना वेग आला. मागील दहा दिवसांपासून युक्रेनमध्ये रशियन सैन्याचा धुदगूस सुरू आहे. युक्रेनची महत्वाची शहरं रशियन आर्मीने स्वत:च्या ताब्यात घेऊन त्यावर हल्ला चढवला.

दरम्यान, रशियाने नागरिकांची ससेहोलपट पाहून तात्पुरती युद्धबंदीची घोषणा केली आहे. (Russia Decalred CeaseFire in Ukraine)

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणानंतर एकाच आठवड्यात सुमारे दहा लाख नागरिकांनी युक्रेनबाहेर स्थलांतर केले आहे. अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. यानंतर युद्धाच्या दहाव्या दिवशी रशियाच्या बाजूने मोठा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. नागरिकांना सुरक्षित कॉरिडॉर देण्यासाठी रशियाने निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय. (Russia Invades Ukraine)

युद्ध सुरू झाल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये वाटाघाटींसाठी चर्चेच्या दोन फेऱ्या पार पडल्या. यानंतरही तोडगा निघाला नसल्याने संयुक्त राष्ट्रांनी चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर आता रशियाच्या बाजूने यासंदर्भात मोठा निर्णय आला आहे. रशियाच्या सरकारने तात्पुरता शस्त्रसंधीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तात्पुरतं युद्ध थांबवण्याचा निर्णय रशियाने घेतला आहे. रशियाने मॉस्कोच्या वेळेनुसार सकाळी 10 वाजल्यापासून युद्धविराम घोषित केलायं. यामुळे नागरिकांना मारियुपोल आणि व्होल्नोवाखा सोडण्याची परवानगी देण्याचीही मागणी झाली आहे.

यामुळे दोन्ही देशांमधील परिस्थिती जैसे थे अशी राहिल. रशियन सैन्य माघारी घेण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय़ आलेला नाही. मात्र, सध्या तात्काळ सिजफायर करण्याचा निर्णय़ रशियाने जाहीर केलाय. नागरिकांचे होणारे हाल पाहता रशियाने निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतंय.

रशियाने तीन बाजूंनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक नागरिक जीवाच्या भयाने देश सोडून गेले आहेत. गेल्या आठवड्यात गुरुवारी झालेल्या आक्रमणानंतर युक्रेनच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन टक्के नागरिकांनी देशाबाहेर आश्रय घेतला असल्याचे ‘यूएन’ने सांगितले.

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने तुफान हल्ले सुरु ठेवले असल्याने या शहरातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हजारो नागरिक मिळेल त्या रेल्वेने शहर सोडत आहेत. किव्ह शहरात रोजच रशियन रणगाडे बाँबफेक करत आहेत. क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.