महाराष्ट्रात महसूल संघटनेचे २२ हजार कर्मचारी ९ दिवसांपासून बेमुदत संपावर

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रात महसूल संघटनेची 22 हजार कर्मचारी वर्ग हे बेमुदत संपावर असून गेल्या चार – पाच वर्षापासून महसूल कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून वर्ग- 4, वर्ग -3 कर्मचारी बांधवांचे पदोन्नतीचा प्रस्ताव मंजूर करण्याची कामे व विविध मागण्या मंजुर करण्यासाठी शासनाने दखल घ्यावी यासाठी आंदोलन सुरू आहे.

शासनाला जागृत करण्यासाठी काळ्या फिती लावून एक दिवस काम केले, नंतर तीन-चार दिवसांची मुदत दिली. संपूर्ण महाराष्ट्र भर कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करत प्रशासनाला जागृत करण्याचे काम केले. पण शासनाने आमची कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्याने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी बांधव या बेमुदत कर्मचारी संपात सहभागी झालो. जर शासनाने आमच्या मागण्या मंजूर केल्या नाही तर आमचा हा लढा आणखी तीव्र होणार आहे या सर्व मागण्यांची आम्ही संविधानिक रित्या मागणी करत आहोत. संविधानाने दिलेले अधिकार हेच आम्ही शासनाकडे मागत आहोत. आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आमचे लोकशाही मार्गाने आंदोलन तीव्र होणार आहे.

आमचा संपाचा आज नववा दिवस आहे. जिल्ह्यात एकूण ११४४ कर्मचारी बांधव बेमुदत संपावर सहभागी आहेत. संपात सर्व कर्मचारी उपस्थिती असल्याने संप यशस्वी झाला आहे. पदोन्नती कोटा 67 टक्क्यांवर 80 टक्के करण्यात यावा आणि अनुकंपाची भरती करण्यात यावी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, सेवा निहाय जागी नवीन कर्मचारी नियुक्ती न झाल्यामुळे आमचा सेवाभावी कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त वाढ आहे, याबाबत कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. कोरोना कालावधी असो वा इतर वेळी महसूल कर्मचारी काम प्रामाणिकपणे करत असतो. महसूल विभागाच्या अतिरिक्त कृषी विभागाची इतर कामे देखील करावे लागतात आणि अतिरिक्त कामांचा भार आमच्या महसूल कर्मचाऱ्यावर येत येत असतो, हा एक प्रकारे आमच्या कर्मचाऱ्यांवर अन्याय आहे असे यावेळी आंदोलकांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.