धरणगाव व अमळनेर स्टेशनचा कायापालट होणार- खा. उन्मेश पाटील

0

लोकशाही न्युज नेटवर्क
मुंबई सेंट्रल डिव्हिजन मध्ये ताप्ती सेक्शन अंतर्गत धरणगाव व अमळनेर रेल्वे स्थानकाच्या विकास करण्यासाठी विविध विकास आराखड्यात या स्टेशनचा समावेश करण्यात आलेला आहे. अमृत भारत स्कीम अंतर्गत होणाऱ्या या कामामुळे धरणगाव स्टेशन व अमळनेर स्टेशनचा कायापालट होणार आहे.

अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच रेल्वेमंत्री अश्विनी जी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व रेल्वे राज्यमंत्री दर्शनाबेन जरदोष व रेल्वे मंत्रालयाच्या वतीने विविध विकास संकल्पना मधून स्टेशन विकास करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे, मुंबई सेंट्रल डिव्हिजन ताप्ती सेक्शन अंतर्गत धरणगाव व अमळनेर स्टेशन चा समावेश असून या स्टेशनचा विकास करण्यासाठी विविध विकास आराखड्या मध्ये समावेश करण्यात आला आहे यासाठी मास्टर प्लॅन रूप प्लान फेस प्लान तयार करण्याच्या दृष्टिकोनातून अमृतभारत स्टेशन योजनेअंतर्गत विकास केला जाणार आहे

धरणगाव व अमळनेर स्टेशन अमृत भारत योजनेअंतर्गत मंजूर झाले आहे यासाठी खान्देश खा. उन्मेश पाटील यांचेध रणगाव स्टेशन सल्लागार समिती चे सदस्य सुनील चौधरी ,आनंद वाजपेयी ,अनिल महाजन ,घनश्याम किरण वाणी ,हिमालय शिखरवार ,संदीप सुतारे ,योगेश ठाकरे ,समाधान पाटील ,किशोर झंवर ,व डी आर यु सी मेंबर पश्चिम रेल्वे प्रतीक जैन व अमळनेर स्टेशन सल्लागार समिती व भारतीय जनता पार्टी व खानदेशातील तमाम जनतेकडून खासदार उन्मेश पाटील यांचे कौतुक व आभार व्यक्त केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.