महापालिकेच्या कारवाईनंतर रस्ता झाला मोकळा

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

महापालिकेने, शहर वाहतूक पोलिसांच्या मदतीने आजपासून धडक कारवाई सुरु केली आहे. शास्त्री टॉवर ते नेहरू चौक दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीला मोकळा झाल्याचे दिसून आले.

शहरातील रस्त्यावरच बेशिस्त दुचाकी व चारचाकी वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने महापालिकेने दुभाजकापासून १२ मीटर अंतरावर रस्त्यावर पांढऱ्या वीटा लावून हे पक्के मार्किंग केले. या पार्किंगच्या नियम मोडणाऱ्यावर कारवाई करतांना आज संबंधित वाहनांची जप्ती सुरु करण्यात आली.

धडक कारवाई
महापालिकेने शास्त्री टॉवर ते नेहरू चौक रस्त्यावर वाहन पार्किंगचे मार्किंगच्या बाहेर वाहने लावू नये असे आदेश दिले. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये विक्रेत्यांची गाडी असल्यास ती पण जप्त करण्यात येणार आहे. महापालिकेने पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई सुरु केली. अतिक्रमण निर्मूलन पथकाने दुचाकी वाहने ट्रॅक्टरमध्ये टाकून जप्त केली आहे. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या चार चाकी वाहनांनाही वाहतूक पोलिसांतर्फे मेमो देण्यात आला आहे.
सकाळी अकराला सुरु झालेल्या कारवाईमुळे नागरिकांनी तसेच अतिक्रमणधारकांनी गाड्या मार्किंगच्या आत लावल्या होत्या.

शहरभर मोहीम

महापालिकेने शहरातील रस्त्यावर दुभाजकापासून १२ मीटर अंतरावर पार्किंगसाठी मार्किंग करणार असून त्याबाहेर लावलेली वाहन जप्त करणार आहे, रस्त्यावरील अतिक्रमित गाड्यांवरही कारवाई करणार आहे. दरम्यान आजच्या कारवाईमुळे शास्त्री टॉवर ते नेहरू चौक रस्त्यावर तसेच टॉवरकडे देखील रिक्षा प्रवासी घेण्यासाठी उभ्या दिसायच्या पण आता त्या गायब झाल्या आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा दिसत होता.

Leave A Reply

Your email address will not be published.