खाद्यसंस्कृती: रसमलाई मोदक

0

गणपती आगमनाची तयारी सुरू झाली आहे. गणरायाच्या स्वागतासाठी सर्व उत्सुक आहेत. घराघरांमध्ये आरास सुरू आहे. आता फक्त आगमनाची आतुरता. गणपती साठी साग्रसंगीत प्रसादाची सुद्धा तयारी महिलावर्गानी केली असेल. पण आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वात जास्त आवडतात ते म्हणजे मोदक.. मग बाप्पाच्या आवडत्या वेगवेगळ्या मोदकाच्या मेजवानीचा आपण बेत करुया..

साहित्य :

अर्धा लिटर दूध, १/३ कप मिल्क पावडर, ३ चमचे साखर, १ चमचा व्हिनेगर, २ रसगुल्ले, थोड्या गुलाब पाकळ्या, १ चमचा पिस्त्याचे काप, १ चमचा विलायची पावडर, २ चमचे केशर दूध, तीन ते चार थेंब केशर कलर

 

कृती:

१. दूध उकळायला ठेवा व त्यात व्हिनेगर टाकून त्याचे पनीर करून गाळून घ्यावे.

२. पनीरचं सगळं पाणी काढून, एका पॅन मध्ये पनीर, मिल्क पावडर व साखर एकत्र करून शिजवून घ्यावे.

३. मिश्रण थोडं घट्ट झाले की त्यात केशर, थोडा केशर कलर, थोड दूध घालावे. थोड्या वेळ परतून गॅस बंद करावा.

४. तयार मिश्रणात २ रसगुल्ले तुकडे करून (हवे असल्यास) गुलाब पाकळ्या व पिस्ता काप घालावे.

५. मिश्रण छान मळून घ्यावे. मोदकाच्या साच्यात घालून त्याचे मोदक करून घ्यावे.

६. बाप्पासाठी छान घरच्या घरी रसमलाई मोदक प्रसाद तयार.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे.

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.