Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर जखमी
    गुन्हे वार्ता

    अज्ञात वाहनाच्या धडकेत मोटरसायकलस्वार ठार, एक गंभीर जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा ;- १५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास जळगाव – पाचोरा राष्ट्रीय महामार्गावर तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) गावालगत हॉटेल जयमल्हार पासून पुढे थोड्याच अंतरावर एका अज्ञात वाहनाने रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी असलेले दुचाकी स्वारांना धडक दिली असता यामध्ये एक इसम जागीच ठार झाला असून दुसऱ्या गंभीर जखमी झाल्याने त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवाशी नितीन नामदेव भोई (वय – ३०) व एकनाथ कोळी (वय – ३२) हे मोटरसायकलने पाचोऱ्याकडुन नांद्र्याच्या दिशेने जात असतांना त्यांच्या दुचाकीस अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने त्यातील नितीन भोई यांचा मृत्यू झाला असून एकनाथ कोळी हे गंभीर जखमी झाले आहेत. या ठिकाणी घटना घडताच तालुक्यातील पहाण येथील शेतकरी स्वप्निल महाजन हे प्रवास करीत असतांना त्यांना अपघात झाल्याचे निदर्शनास आले असता त्यांनी तात्काळ हायवे मृत्युंजय दूत राहुल महाजन यांना घटनास्थळी बोलून घटनेची माहिती मिळताच हायवे मृत्युंजय पथकाचे राहुल महाजन हे घटनास्थळी दाखल होवुन त्यांनी तात्काळ रुग्णवाहिका चालकास पाचारण केले. दरम्यान नितीन भोई व एकनाथ कोळी यांना रुग्णवाहिका चालक गोलु शिंदे यांच्या मदतीने पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी नितीन भोई यांना मृत घोषित केले. तर एकनाथ कोळी यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.

    #crime #pachora accident apghat jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif