गॅस गिझरमुळे महिला वैमानिकाचा मृत्यू; बाथरुममध्ये आढळला मृतदेह

0

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकमध्ये एअर इंडियाच्या महिला वैमानिकाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. घरातील बाथरुममध्ये बेशुद्धावस्थेत त्या आढळल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

रश्मी गायधनी असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. रश्मी गायधनी या मुंबईत एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून कार्यरत होत्या. नाशिकमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात असून खळबळ माजली आहे. गॅस गिझरमधून वायू गळती झाल्यामुळे रश्मी मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. पोलीस मात्र गॅसगळती नसावी असं सांगत असून याप्रकरणी तपास करत आहेत.

रश्मी गायधनी एअर इंडियामध्ये वरिष्ठ वैमानिक होत्या. आंघोळीच्या वेळी गॅस गिझरमधून गळती झाल्यामुळे बाथरुममध्येच गुदमरुन रश्मी गायधनी यांना यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. रश्मी गायधनी यांच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सरकारवाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साजन सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “५ फेब्रुवारीला दर्शन कॉलनीत पाहणाऱ्या ४८ वर्षीय रश्मी यांचा संध्याकाळी ७ वाजता आंघोळीला गेल्या असता बेशुद्धावस्थेत आढळल्या. उपचारासाठी सिव्हील रुग्णालयात दाखल केलं असता त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आकस्मित मृत्यूची नोंद आम्ही केली आहे”.

दरम्यान यावेळी त्यांनी गॅसगळती नसावी असं म्हटलं आहे. बेशुद्ध अवास्थेत त्या सापडल्या होत्या, शवविच्छेदन अहवालात संपूर्ण माहिती समोर येईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.