नेहरू युवा केंद्र व विश्वात्मा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने आत्मनिर्भर युवा शिबिर संपन्न

0

चाळीसगाव,लोकशाही न्यूज नेटवर्क

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगाव व विश्वात्मा प्रतिष्ठान चाळीसगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने चाळीसगाव येथे ‘आत्मनिर्भर भारत’ युवा शिबिराची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे अध्यक्षीय उद्घाटन प्राचार्य बाळासाहेब चव्हाण व प्रमुख अतिथी आयकर सहआयुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विश्वात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अ‍ॅड. राहूल वाकलकर, प्रमुख वक्ते डॉ. अभिषेक अग्रवाल, प्रा. योगेश पाटील, प्रा. सचिनकुमार दायमा, रमेशजी पोतदार उपस्थित होते.

प्राचार्य बाळासाहेब चव्हाण यांनी अध्यक्षीय भाषणात सांगताना स्वामी विवेकानंदच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असून अशा युवा शिबिराच्या आयोजनातून तरुणाईला प्रत्यक्ष विचारांना कृतीची जोड मिळण्यास वाव मिळतो आणि विविध क्षेत्रात प्रभावी भूमिका बजावण्याची प्रेरणा मिळते.

प्रमुख अतिथी आयकर सहआयुक्त डॉ. उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी आत्मनिर्भर भारतासाठी नेहरु युवा केंद्राचे कार्य हे युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तरुणांनी सर्वच क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयन्तशील असावे ज्यातून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात हातभार लागण्यास मदत होईल यावर सूतोवाच केले.

प्रमुख वक्ते योगेश पाटील यांनी आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वयंनिर्भर होण्यासाठी योग्य योजना आखणे आणि त्यावर अंमलबजावणी करणे हा ह्यामागचा मुख्य हेतु आहे असे सांगितले.

डॉ. अभिषेक अग्रवाल यांनी कोरोना जनजागृती संदर्भात सखोल मार्गदर्शन करून तरुणाईच्या मनातील सर्व प्रश्नांची शंका निरसन केले. प्रा. सचिनकुमार दायमा यांनी फिट इंडियाचे महत्व सांगून तरुणाईला खेळ, ट्रेकिंग, योगा, व्यायाम, आहार यावर मार्गदर्शन केले.

रमेशजी पोतदार यांनी कॅच द रेन याविषयावर मार्गदर्शन करतांना पाण्याचे महत्व व नियोजनाचे महत्व सांगून, पाण्याची सर्वव्यापी चळवळ उभी करण्याचा मानस व्यक्त केला.

कार्यक्रमाची प्रस्तावना अ‍ॅड. राहूल वाकलकर यांनी करतांना नेहरू युवा केंद्राच्या युवा कार्यशाळेचे महत्व सांगताना उद्देश, हेतू अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्राचे चाळीसगाव तालुका समन्वयक शंकर पगारे यांनी केले. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी नरेंद्रजी डांगर, अजिंक्य गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विश्वात्मा प्रतिष्ठाचे संचालक प्रतीक शुक्ला, कुलदीप चौधरी, आकाश धनगर, प्रा. धनंजय पाटील, उमेश हांडे, मयूर रावते, राज राजपूत, दीपक निकम, रुपेश सूर्यवंशी, पियुष शुक्ला, बाला परदेशी, संघर्ष अभ्यासिकेचे संचालक दिपक बच्छे, अमोल रावते यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.