पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात येणाऱ्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मान्सून परतीला सुरुवात झाली असली तरी अद्यापही राज्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे.
बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात पुढील 24 तासांत अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत ठाणे, मुंबई, उपनगरसह राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण दिसून येईल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे, मुंबईसह राज्यात परतीच्या पावसाचा जोरदार मारा होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील 48 तास या विभागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांत अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथे पावसासोबत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले असून सर्व उपाय योजना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. येथे 5 ऑक्टोबरनंतर आकाश अंशतः ढगाळ राहून हवामान कोरडे राहील. त्यामुळे, पावसाची शक्यता कमी असणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.