आर अश्विनचा नवा विक्रम, WTC इतिहासात ही कामगिरी करणारा पहिलाच भारतीय

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसातील पहिल्याच सत्रात आर अश्विनने एका झटक्यात दोन विक्रम केले आहे. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा, या जोडीने अनिल कुंबळे व हरभजन सिंग या दोघांना मागे टाकत, टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारी जोडी ठरली आहे. या दोघांच्या नावावर आता 502 विकेट्सची नोंद झाली आहे. अश्विन आणि जडेजा ही जोडी टीम इंडियाची सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे. त्यानंतर अश्विन याने टीम इंडियाची अभिमानाने मान उंचावली आहे.

आर अश्विन याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात 150 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. अश्विन टीम इंडियासाठी अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला आहे. तसेच अश्विन यासह 150 विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने अवघ्या 31 कसोटी सामन्यांमध्ये 150 विकेटचा आकडा गाठला आहे. अश्विन याच्या आधीही कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या दोघांनी केली आहे.

500 विकेट्सच्या उंबरठ्यावर
दरम्यान आर अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट्स घेण्याच्या उंबरठ्यावर आहे. अश्विनी इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात लंच पर्यंत दोन विकेट्स घेतले आहे. त्यामुळे अश्विन च्या नावावर 492 विकेट्स झाले आहेत. त्यामुळे आता अश्विनला पाचशेचा टप्पा गाठण्यासाठी आठ विकेटची गरज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.