Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक.. पत्नीचा केला खून मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासजवळ फेकले
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक.. पत्नीचा केला खून मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासजवळ फेकले

    Tushar BhambareBy Tushar BhambareMarch 22, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क 

    पुणे ;शहरातील मंतरवाडी येथे पतीने चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा गळा दाबून खून करून मृतदेह साडीत गुंडाळून कात्रज बायपासजवळ मोकळया जागेत फेकून दिल्याची धक्कादायक घटना मंतरवाडी येथे उघडकीस आली आहे. विद्या राहूल फडतरे (23) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

    याप्रकरणी तिचा पती राहूल ज्ञानोबा फडतरे (वय-32 रा. मंतरवाडी, ता. हवेली, जि. पुणे) याला लोणी काळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलीचे वडील दत्तात्रय कृष्णा शेडगे (वय-50,रा.परिंचे, ता. पुरंदर, पुणे) यांनी लोणी काळभोर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

    राहूल सतत पत्नीच्या चारित्र्यावर घेत होता संशय

    राहूल फडतरे हा वाहन चालक म्हणून काम करत असून, त्याचे सात वर्षापूर्वी विद्या बरोबर लग्न झाले होते. त्यांना तीन वर्षाचा मुलगाही आहे. राहुल हा विद्याच्या चारित्र्यावर सातत्याने संशय घेऊन तिच्याशी वाद घालत होता. याबाबत तिने सासवड पोलिसांकडे तक्रार देखील दिली होती. यात तिच्या सासरच्यांवर कारवाई देखील झाली आहे.

    हा वाद संपविण्यासाठी दोन्ही बाजूच्या कुटुंबीयांची बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यात आला. बैठकीत ठरल्यानुसार माहेरी गेलेली विद्या पुन्हा सासरी नांदण्यासाठी गेली होती. मात्र, सोमवारी (दि. 21) रोजी दुपारी फिर्यादी शेडगे यांना हडपसर पोलिस ठाण्यातून फोन आला. त्यानुसार ते आणि त्यांची पत्नी हडपसर पोलिस ठाण्यात गेले. तेथे त्यांना विद्या हिचा गळा दाबून राहुल फडतरे याने खून केल्याचे सांगण्यात आले.

    मृतदेह खांद्यावर नेऊन टाकल्याची कबुली

    कात्रज-बायपास रस्त्यावर मंतरवाडी येथील मोकळया जागेत हडपसर पोलीसांना एका साडीत गुंडाळलेला महिलेचा मृतदेह सापडला. पोलीसांनी तिची ओळख पटवून त्याबाबत राहुल याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.

    21 मार्च रोजी रात्री साडेबारा वाजण्याचे सुमारास पती-पत्नी घरात असताना, राहुल याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा दाबून खून करुन पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह साडीत गुंडाळून खांद्यावर उचलून नेला व घराजवळील मोकळया प्लॉट मध्ये फेकून दिल्याचे सांगितले. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिगंबर बिडवे पुढील तपास करत आहे.

    #murder pune Pune crime news
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif